Raj Thackeray Interview : खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली.
Raj Thackeray Interview : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेकदा माझ्या हातात सत्ता द्या, सगळ्यांना सूतासारखं सरळ करतो असं म्हटलं आहे. मात्र राज ठाकरे यांच्या हातात एक दिवस सत्ता दिली तर ते काय याचं उत्तर मिळालं आहे.
एका माध्यम समूहाच्या खाजगी कार्यक्रमात राज ठाकरे यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीत अमृत फडवणी यांनी राज ठाकरे यांना याबाबत विचारलं.
एक दिवस राज्यातील सत्ता हाती आली तर काय कराल? या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे यांनी म्हटलं की, एका दिवसात काय होतं? असं एका दिवसाला काही अर्थ नसतो. सहा महिने, एक दिवस, पाच दिवस यातून काही होतं असं मला काही वाटतं नाही. माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत ज्या सत्तेत राहून करता येतील.