MI vs RR, Match Highlights: यशस्वी जयस्वालची शतकी खेळी व्यर्थ गेली.

MI vs RR, Match Highlights: सुर्यकुमार यादवचे अर्धशतक आणि टीम डेविडच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने राजस्थानचा सहा विकेटने पराभव केला. राजस्थानने दिलेल्या 212 धावांचे आव्हान मुंबईने तीन चेंडूत आणि सहा विकेट राखून यशस्वी पार केले. राजस्थानचा पराभव करत मुंबईने रोहित शर्मा याला वाढदिवसाचे गिफ्ट दिले. यशस्वी जयस्वाल याची शतकी खेळी व्यर्थ गेली. सुर्यकुमार यादव याने 55 धावांची खेळी केली. तर टीम डेविड याने अखेरीस 14 चेंडूत 45 धावांचा पाऊस पाडला. 

राजस्थानने दिलेल्या 213 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार रोहित शर्मा अवघ्या तीन धावांवर बाद झाला. त्यानंतर ईशान किशन आणि कॅमरुन ग्रीन यांनी मुंबईचा डाव सावरला. पण दोघांनीही एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या.  ईशान किशन याने 28 धावांची खेळी केली. तर कॅमरुन ग्रीन याने याने 44 धावांचे योगदान दिले. या दोघांना आर. अश्विन याने तंबूत धाडले. ग्रीन याने दोन षटकार आणि चार चौकार लगावले. 

सूर्यकुमार यादव याने मुंबईचा डाव सावरला. सुर्यकमार यादव याने झटपट धावा जमवल्या. सुर्यकुमार आणि तिलक वर्मा यांनी मुंबईच्या डावाला आकार दिला. सुर्यकुमार यादव याने 29 चेंडूत 55 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने आठ चौकार आणि दोन षटकार लगावले. सुर्यकुमार यादव मुंबईला सहज विजय मिळून देईल असे वाटत होते.. पण बोल्टच्या गोलंदाजीवर संदीप शर्मा याने जबरदस्त झेल घेतला. सुर्यकुमार बाद झाल्यानंतर टीम डेविड आणि तिलक वर्मा यांनी मुंबईला विजय मिळवून दिला.

तिलक वर्मा याने नाबाद 29 धावांची खेळी केली. तर टीम डेविड याने 14 चेंडूत 45 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये डेविड याने पाच षटकार लगावले. राजस्थानकडून आर अश्विनयाने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर संदीप शर्मा आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

Batter RB4s6sSR
 Rohit Sharma (c) b Sandeep Sharma350060.00
 Ishan Kishan (wk) c Trent Boult b Ravichandran Ashwin282340121.74
 Cameron Green c Trent Boult b Ravichandran Ashwin442642169.23
 Suryakumar Yadav c Sandeep Sharma b Trent Boult552982189.66
 Tilak Varmanot out292131138.10
 Tim Davidnot out451425321.43
Extras( nb 1, w 7, b 0, lb 2, pen )10   

राजस्थानच्या गोलंदाजांची कामगिरी पाहा 

 Trent Boult 443110.758
 Sandeep Sharma 43518.755
 Ravichandran Ashwin 42726.758
 Yuzvendra Chahal 332010.675
 Jason Holder 3.355015.714
 Kuldeep Sen  1200202

दरम्यान, यशस्वी जायस्वाल याच्या झंझावाती शतकाच्या बळावर राजस्थानने 20 षटकात सात विकेटच्या मोबदल्यात 212 धावांपर्यंत मजल मारली. यशस्वी जायस्वाल याने 124 धावांची शतकी खेळी केली. यंदाच्या आयपीएलमधील हे तिसरे शतक होय.. तर मुंबईविरोधात दुसरे शतक आहे.  

यशस्वी जायस्वालचा झंझावात – 

पहिल्या चेंडूपासून यशस्वी जायस्वाल याने मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. यशस्वी जायस्वाल याने दमदार शतकी खेळी केली. यंदाच्या आयपीएलमधील हे तिसरे शतक होय. हॅरी ब्रूक आणि वेंकटेश अय्यर यांच्यानंतर यशस्वी जायस्वाल याने शतक झळकावले आहे. विशेष म्हणजे, वेकंटेश अय्यर आणि यशस्वी जायस्वाल यांनी मुंबईविरोधात शतकी खेळी केली आहे. यशस्वी जायस्वाल याने आज मुंबईच्या गोलंदाजांची पिसे काढली. यशस्वी जायस्वाल याने 62 चेंडूत 124 धावांची खेळी केली. या खेळीत जायस्वाल याने 8 खणखणीत षटकार लगावले. त्याशिवाय 16 चौकारही मारले आहेत. यशस्वी जायस्वाल याच्यानंतर राजस्थानकडून सर्वाधिक धावा अतिरिक्त आहेत. 124 धावांची खेळी करत यशस्वी जायस्वाल याने ऑरेंज कॅपवर कब्जा मिळवलाय. यशस्वी जायस्वाल याने 9 सामन्यात 428 धावांचा पाऊस पाडलाय.

इतर फलंदाजांचा फ्लॉप शो – 

यशस्वी जायस्वाल याचा अपवाद वगळता राजस्तानच्या एका फलंदाजाला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. जोस बटलर, संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल आणि जेसन होल्डर प्रभावी कामगिरी करण्यात अपयशी ठरले. जोस बटलर याने 19 चेंडूत 18 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने दोन चौकार आणि एक षटकार लगवाला, तर संजू सॅमसन याने एक चौकार आण एका षटकारासह 10 चेंडूत 14 धावांचे योगदान दिले. देवदत्त पडिक्कल अवघ्या दोन धावांवर तंबूत परतला. तर जेसन होल्डर याने एका षटकारासह 11 धावांचे योगदान दिले. हेटमायर आणि ध्रुव जुरेल यांनाही प्रभावी फलंदाजी करताना आली नाही. हेटमायर याने 9 चेंडूत 8 धावांचे योगदान दिले, यामध्ये एक षटकार लगावला. तर ध्रुव जुरेल दोन धावांवर बाद झाला. यशस्वी जायस्वाल याचा अपवाद वघळता एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या ओलांडता आली नाही. आर. अश्विन याने पाच चेंडूत नाबाद आठ धावांची खेळी केली.

फलंदाजांची कामगिरी पाहा – 

Batter RB4s6sSR
 Yashasvi Jaiswalc & b Arshad Khan12462168200.00
 Jos Buttler c (Sub) Ramandeep Singh b Piyush Chawla18192194.74
 Sanju Samson (c)(wk)c Tilak Varma b Arshad Khan141011140.00
 Devdutt Padikkalb Piyush Chawla240050.00
 Jason Holderc Tim David b Jofra Archer11901122.22
 Shimron Hetmyerc Suryakumar Yadav b Arshad Khan890188.89
 Dhruv Jurelc Tilak Varma b Riley Meredith230066.67
 Ravichandran Ashwinnot out8510160.00
 Trent Boultnot out0000
Extras( nb 1, w 16, b 1, lb 7, pen )25

मुंबईची गोलंदाजी कशी ?

पीयूष चावलाचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला प्रभावी मारा करता आला नाही. चावलाने चार षटकात 34 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. तर जोफ्रा आर्चर, रायली मेरिडेथ यांनाही प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. अर्शद खान याने तीन फलंदाजांना तंबूत धाडले.  

 Cameron Green 331010.3310
 Jofra Archer 43518.7516
 Riley Meredith 451112.757
 Piyush Chawla 43428.511
 Kumar Kartikeya Singh 214076
 Arshad Khan 3393135

By Shiv

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *