Electrical Vehical | इलेक्ट्रिकल व्हेईकल काळाची गरज; नवी क्रांती नवी संधी…

भारताची आघाडी :- भारताचे केंद्रीय रस्ते विकास मंत्री आज काल इलेक्ट्रिकल व्हेईकल या विषयावर खूप बोलत असतात. पारंपारिक उर्जा संवर्धनासाठी हि वाहने आपल्यासाठी खूपच उपयुक्त ठरू शकतील. आज काल आपल्या भारत देशात या वाहनांचा खूपच वापर वाढलेला आहे. त्यामुळे जवळच्या मोठ्या मोटार उद्योगांना इलेक्ट्रिकल वाहने बनवण्यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. त्यामुळे या क्षेत्रासाठी आवश्यक अशा तंत्रकुशल मनुष्यबळाची गरज भासू शकेल.

तंत्रकुशल मनुष्यबळाची गरज :- सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्सच्या अहवालानुसार, भारतात 2023 पर्यंत या क्षेत्रात 3 कोटी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. हे लक्षात घेऊन भारतातील काही अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांनी या विषयाशी संबंधित विविध कालावधीचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

ELECTRICAL VEHICAL | इलेक्ट्रिकल व्हेईकल काळाची गरज; नवी क्रांती नवी संधी…

भारत सरकारने 2025 पर्यंत या क्षेत्रासाठी आवश्यक मनुष्यबळ विकसित करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी DY गुरूसोबत सहयोग करार केला आहे. हा एक वर्कशॉप इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम आहे. ऑटोमोटिव्ह, ऑटो-कॉम्पोनंट, डिझाइन आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात काम करणारे किंवा काम करण्याची इच्छा असलेले लोक या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतात.

IIT मद्रासच्या सेंटर फॉर आउटरीच आणि ऑनलाइन एज्युकेशनने ई-मोबिलिटी आणि इलेक्ट्रिक वाहन अभियांत्रिकीमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. यात बॅटरी, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, ई-मोबिलिटी, पॉवरट्रेन आणि इंधन, ई-मोबिलिटीसाठी साहित्य, इलेक्ट्रिक वाहन बाजाराची सद्यस्थिती, वाहन अभियांत्रिकी आणि विकास, किंमत आणि बरेच काही यासारख्या विषयांचा समावेश आहे.

या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची वाढती मागणी लक्षात घेऊन इंटरशाला प्लेसमेंट गॅरंटीड कोर्स, इंटरशाला ट्रेनिंगने इलेक्ट्रिक व्हेईकलशी संबंधित प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे, ज्यामध्ये प्रशिक्षणासोबत इंटर्नशिपची हमीही दिली जाते. हे प्रशिक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यावसायिकांकडून दिले जाते. यामध्ये या क्षेत्रातील उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन प्रशिक्षण प्रकल्पांचा समावेश असेल. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर संस्था प्लेसमेंटसाठीही तयारी करेल.

Electrical Vehical | कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेने एक वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ई-मोबिलिटी अभ्यासक्रम सुरू केला आहे. पात्रता- मेकॅनिकल, प्रोडक्शन, मेटलर्जी आणि मटेरियल सायन्स, इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग, मेकॅट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन या विषयातील पदवीधर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉइस स्क्रीनिंग टेस्ट घेतली जाईल. या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवर्गनिहाय प्रवेश निश्चित केला जाईल. या कोर्समध्ये इलेक्ट्रिकल व्हेईकल ऑपरेटिंग सिस्टीम डिझाईन, एनर्जी स्टोरेज सिस्टीम, सुपरचार्ज आणि फ्युएल सेल, पॉवरट्रेनर्स अँड कंट्रोल्स इन इलेक्ट्रिक व्हेइकल्स, इंटरनॅशनल स्टँडर्ड्स, इलेक्ट्रिक व्हेइकल्ससाठी सरकारी नियम इत्यादी विषयांचा समावेश आहे.

Electrical Vehicle | ग्रेट लेक्स एक्झिक्युटिव्हने इलेक्ट्रिकल व्हेईकल डिझायनिंगमध्ये आठ महिन्यांचा पदव्युत्तर कार्यक्रम सुरू केला आहे. हा कोर्स ऑनलाईन करता येतो. ऑडिओ टेप केलेले आणि छायाचित्रित सूचना सत्र प्रदान करते. या उद्योगात काम करणाऱ्या तज्ञांनी हा अभ्यासक्रम तयार केला आहे. प्लेसमेंट सहाय्य दिले जाते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एखाद्याला डिझाईन अभियंता, पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी, चाचणी अभियंता, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी इत्यादी विविध पदांवर काम करण्याची संधी मिळू शकते. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, उत्पादन, औद्योगिक, इलेक्ट्रॉनिक्स किंवा पदव्युत्तर विद्यार्थी हा अभ्यासक्रम करू शकतात.

By Shiv

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *