PM Kisan : ‘पीएम किसान सन्मान’ साठी पोस्टामध्ये आधार लिंकिंग सुविधा | PM किसान सन्मान निधी योजना : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना 14 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
14 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावात पोस्टाद्वारे प्रदान केली जाते. संबंधित लाभार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
सध्या राज्यात १२ लाख ९१ हजार लाभार्थ्यांची बँक खाती त्यांच्या आधार क्रमांकाशी लिंक केलेली नाहीत. त्यामुळे या लाभार्थीच्या खात्यात 14 व्या हप्त्याचा लाभ दिला जाणार नाही. यासाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक यासारख्या कागदपत्रांच्या आधारे लाभार्थ्याने आपल्या गावातील टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांमार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (IPPB) खाते उघडावे. हे बँक खाते ४८ तासांच्या आत तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक केले जाईल.
ही पद्धत अतिशय सोपी आणि सोयीस्कर आहे कारण ती कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येते. ‘IPPB’ मध्ये बँक खाते उघडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्ट ऑफिसमध्येच उपलब्ध असल्याने लाभार्थ्यांना इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही. आयपीपीबीमध्ये किसान योजनेंतर्गत प्रलंबित लाभार्थ्यांची बँक खाती उघडण्यासाठी आणि त्यांना आधार क्रमांकाशी लिंक करण्यासाठी पीएम गावनिहाय यादी राज्य IPPB कार्यालयाला उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्यानुसार, ग्राम पोस्ट मास्तर या लाभार्थ्यांशी संपर्क साधतील आणि ‘IPPB’ मध्ये बँक खाती उघडतील. योजनेच्या 14 व्या हप्त्याच्या लाभासाठी ‘आधार’ शी जोडलेले बँक खाते अनिवार्य असल्यामुळे, 15 मे 2023 पर्यंत ‘IPPB’ मार्फत गावपातळीवर मोहीम राबविण्यात येत आहे.