Ishita Shukla Ravi Kishan Daughter Joins Indian Army: अभिनेते आणि भाजप नेते रवी किशन यांची मुलगी इशिता शुक्ला भारतीय लष्करात भरती झाली आहे. अग्निपथ योजनेंतर्गत इशिता संरक्षण दलात रूजू होणार आहे. ती देश सेवेसाठी सज्ज झाली आहे.
केंद्रातील मोदी सरकारनं अग्निपथ योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत तरुणांना चार वर्षांच्या कालावधीसाठी संरक्षण दलात सेवा करण्याची संधी देण्यात येते.
रवी किशन यांनी सोशल मीडिया अकाउंटवर ही आनंदाची बातमी शेअर केली. इशिता केवळ २१ वर्षांची आहे. रवी किशन यांनी मुलगी इशिता ही दिल्ली संचालनालयाच्या ‘७ गर्ल बटालियन’ची कॅडेट आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
नेटकऱ्यांनी मात्र इशिताच्या या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका स्टारची मुलगी असूनही स्वत:साठी वेगळा करिअरचा मार्ग निवडल्याबद्दल नेटकऱ्यांनी इशिताचे कौतुक केले आहे. “देवाचे आभार, काही अभिनेत्यांच्या मुलांनी अभिनय किंवा चित्रपट क्षेत्रात करिअर केले नाही. तिला शुभेच्छा. आर माधवनचा मुलगाही खूप हुशार आहे, तसाच माधुरीचा मुलगाही हुशार आहे”, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली.
“मला वाटतं हा पहिला राजकारणी, ज्याची मुलगी संरक्षण दलात सहभागी होऊन देशाची सेवा करेल. भारत बदलत आहे,” असं अन्य एका यूजरनं म्हटलंय. “राजकारण्यांच्या मुलांना पहिल्यांदाच डिफेन्समध्ये जाताना पाहून आनंद होत आहे”, असं एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे.