अखिल भारतीय किसान काँग्रेसचे गटशिक्षणाधिकार्‍यांना निवेदन

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
मागील दहा दिवसांपासुन इयत्ता 4 थी वर्गाला शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. तरी जिल्हा परिषद शाळा राडी येथील 4 थीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकाची तात्काळ नियुक्ती करावी अन्यथा या प्रश्‍नी राडी येथील नागरिक व पालक उपोषणास बसतील असा इशारा अखिल भारतीय किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गंगणे यांनी दिला आहे. या बाबत सोमवार, दि. 17 जुलै रोजी गटशिक्षणाधिकारी, अंबाजोगाई यांना निवेदन देण्यात आले आहे. सदरील निवेदन देताना गणेश गंगणे, पांडुरंग गंगणे, अनंत जाधव, आश्रुबा कस्पटे, श्रीकृष्ण किर्दंत, नामदेव गंगणे, प्रेम घोबाळे आदींसह इतरांची उपस्थिती होती.

…तर गटशिक्षणाधिकारी कार्यालयात भरविणार वर्ग :

राडी येथील जिल्हा परिषद शाळेत 4 थी च्या वर्गात शिकविण्यासाठी मागील दहा दिवसांपासुन शिक्षक नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कोविड कालावधी पासून तसेही विद्यार्थ्यांचे नुकसानच झालेले पहावयास मिळत आहे. कारण, ऑनलाईन शिक्षण व्यवस्थित न मिळाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी मुलभुत शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. पुढील दोन दिवसांत 4 थीच्या वर्गासाठी शिक्षकाची नियुक्ती केली नाही. तर अंबाजोगाई येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात इयत्ता 4 थी चा वर्ग भरविणार आहोत असा इशारा अखिल भारतीय किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गंगणे यांनी दिला आहे.

By Shiv

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *