Manoj Jarange Patil, Hingoli : “छगन भुजबळ यांना दुसरे काही काम नाही, त्यांनी सर्व पडेल लोक गोळा केले आहेत. सर्वांना काय भाषण करायचं हे वाटून दिलंय. सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही. मराठ्यांना कमजोर समजू नका. बीड जिल्ह्यातील मराठ्यांवरील त्रास थांबवा”
Manoj Jarange Patil, Hingoli : “छगन भुजबळ यांना दुसरे काही काम नाही, त्यांनी सर्व पडेल लोक गोळा केले आहेत. सर्वांना काय भाषण करायचं हे वाटून दिलंय. सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही. मराठ्यांना कमजोर समजू नका. बीड जिल्ह्यातील मराठ्यांवरील त्रास थांबवा”, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. जरांगे पाटील यांनी आज शांतता रॅलेला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
मनोज जरांगे म्हणाले, आम्ही सरकारवर विश्वास टाकला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास टाकलेला आहे. त्यामुळे आमच्या मागण्या पूर्ण करा. अन्यथा आणखी मोठा जनसमुदाय उसळेल,असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय. मनोज जरांगे यांनी आज पासून मराठवाड्याच्या दौरा सुरू केला असून हिंगोली शहरात आता रॅलीला सुरुवात झाली आहे. रॅलीत मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील नागरिकांची गर्दी पहायला मिळत आहे. सगळीकडे भगवे झेंडे आणि भगव्या टोप्या पाहायला मिळत आहेत.
एकटाच्या लढण्यात आणि करोडोंच्या लढण्यात खूप शक्ती असते
मराठा आंदोलक मनोज जरांगे मराठवाडा दौऱ्यासाठी अंतरवाली सराटीतून रवाना झाले आहेत. मनोज जरांगे पाटील आज (दि.6) हिंगोली दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत हिंगोलीत आज मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली निघाली आहे. एकटाच्या लढण्यात आणि करोडोंच्या लढण्यात खूप शक्ती असते, त्यामुळे मराठा समाजाने या शांतता रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जरांगे यांनी केलंय.
राजकीय इच्छा शक्ती असली तर 7 दिवस नाही, 2 घंट्यात कायदेशीर टिकणारे निर्णय होऊ शकतात
आंदोलक म्हणून आशा बाळगणे माझे कर्तव्य असून आम्ही 13 तारखेपर्यंत सरकारवर आशा ठेवून असल्याचं जरांगे म्हणाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासह अंतरवाली सराटीमधील सर्व गुन्हे मागे घेतील असा आम्हाला विश्वास असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय. राजकीय इच्छा शक्ती असली तर 7 दिवस नाही, 2 घंट्यात कायदेशीर टिकणारे निर्णय होऊ शकतात, असं जरांगे यांनी सरकारला उद्देशून म्हटलंय.