IPL 2023, CSK vs SRH: रविंद्र जाडेजाचा भेदक मारा आणि डेवॉन कॉनवे याचे वादळी अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने हैदराबदचा सात विकेटने पराभव केला.

IPL 2023, CSK vs SRH: रविंद्र जाडेजाचा भेदक मारा आणि डेवॉन कॉनवे याचे वादळी अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने हैदराबदचा सात विकेटने पराभव केला. हैदराबादने दिलेले १३५ धावांचे आव्हान चेन्नईने सात विकेट आणि आठ चेंडू राखून आरामात पार केले. चेन्नईकडून डेवेन कॉनवे याने नाबाद ७७ धावांची खेळी केली. 

हैदराबादने दिलेले १३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने दमदार सुरुवात केली. ऋतुराज गायकवाड आणि डेन कॉनवे यांनी ८७ धावांची सलामी भागिदारी केली. सलामीची जोडी शतकी भागिदारी करणार असे वाटले तेव्हा दुर्दैवीरित्या ऋतुराज धावबाद झाला. कॉनवेने मारलेला चेंडू थेट स्टम्पला लागला.. त्याआधी चेंडूला गोलंदाजाचा हात लागला होता. त्यामुळे ऋतुराज गायकवाड बाद झाला. ऋतुराज गायकवाड याने ३५ धावांची खेळी केली. ऋतुराज बाद झाल्यानंतर चेन्नईने लागोपाठ दोन विकेट गमावल्या. अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायडू यांनी प्रत्येकी नऊ धावांचे योगदान दिले. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला कॉनवेने धावांचा  पाऊस पाडला. कॉनेवेने नाबाद ७७ धावांची खेळी केली. मोईन अली ६ धावांवर नाबाद राहिलाय. 

By Shiv

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *