सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे हे राज्याला नाही देशाला कळले आहे असा टोलाही विश्वजित कदम यांनी महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना लगावला .
सोलापूर : लोकसभा निकालावरून (Lok Sabha Election) विधानसभेची गणिते (Vidhan Sabha Election) मांडणे चुकीचे असून विधानसभेचे प्रश्न वेगळे असतात , त्यामुळे या निवडणुकीत गाफील राहणे योग्य नसून जिंकायला कष्ट करावे लागतील अशा शब्दात आज काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी कान टोचले आहेत. विधानसभेला केवळ 50 ते 60 दिवस राहिले असताना पक्ष आणि उमेदवार म्हणून भरपूर तयारी करावी लागते, असे देखील विश्वजीत कदम म्हणाले.
विधानसभा मतदारसंघात मतदान कमी असते अशात थोडी मते जरी इकडची तिकडे झाली तरी निकाल बदलू शकतात असे सांगत निवडून येण्यासाठी कष्ट करावे लागणार आहे . यासाठी पक्ष आणि उमेदवाराला मेहनत घ्यावी लागेल , कार्यकर्त्यांची सांगड घालावी लागेल आणि हे सगळे जुळले तर विधानसभेला महाविकास आघाडी विजयी होईल असा विश्वास विश्वजित कदम यांनी व्यक्त केला . सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे हे राज्याला नाही देशाला कळले आहे असा टोलाही विश्वजित कदम यांनी महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना लगावला .
विधानसेसाठी गाफील नको : विश्वजीत कदम
विधानसेसाठी अजून महायुती अथवा महाविकास आघाडी यातील जागा वाटपाचे सूत्र ठरलेले नाही . त्यानंतर जागा वाटप ठरेल आणि मग उमेदवार ठरतील असे कदम यांनी सांगितले . लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुकांकडे वेगळ्या नजरेने पहिले पाहिजे , महाविकास आघाडी म्हणून आमच्या सर्व घटक पक्षांनी एकदिलाने लढले पाहिजे असे सांगितले . लोकसभेच्या विजयामुळे गाफील न राहता विधानसभा निवडणूक आम्ही ताकतीने लढवणार असेही विश्वजित कदम यांनी सांगितले . काल विधानपरिषदेत लागलेल्या निकालानंतर विश्वजित कदम यांनी अतिशय सावधपणे माध्यमांना प्रतिक्रिया दिली . आज कदम हे आपल्या कुटुंबासह विठ्ठल दर्शनासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला .