Operation Kaveri : आफ्रिकन देश सुदान सध्या गृहयुद्धाचा सामना करत आहे. या धोकादायक परिस्थितीत सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू केले आहे.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे. ते ट्वीट करत म्हणाले आहेत की, ऑपरेशन कावेरी सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत सुमारे 500 भारतीय सुदानमधील बंदरावर पोहोचले आहेत.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्वीट केले की, “सुदानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी सुरू आहे. जवळपास 500 भारतीय सुदानमधील बंदरावर पोहोचली आहेत. आणखी भारतीय मार्गावर आहेत. आमची जहाजे आणि विमाने त्यांना परत आणतील. सुदानमधील आपल्या सर्व बांधवांना मदत करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे.”

आज याआधी फ्रान्सने 28 देशांतील 388 लोकांना सुदानमधून बाहेर काढले आहे. या लोकांमध्ये भारतीयांचाही समावेश आहे. भारतातील फ्रेंच दूतावासाने ट्वीट केले की, ‘फ्रेंच बचाव कार्य सुरूच आहे. काल रात्री 28 देशांतील 388 लोकांना दोन लष्करी उड्डाणांच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आले. यामध्ये भारतीयांचाही समावेश आहे.

By Shiv

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *