मुंबई : शिक्षण क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील 36 शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे पत्र शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी एसीबीला लिहिले आहे. शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याने आयुक्तांनी एसीबीला पत्र लिहिले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विभागामध्ये पैशाच्या मोबदल्यात बदल्या झाल्याची बातमी एबीपी माझाने प्रसारित केल्यानंतर शिक्षण क्षेत्रातील अनेकांकडून शिक्षण क्षेत्रात बदलीसाठी होत असलेला भ्रष्टाचार उघड करण्याची मागणी होत आहे.
शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. अधिकारी लाच घेताना पकडले जातात मात्र पुन्हा सेवेत येतात, पुन्हा भ्रष्टाचार करतात पण कारवाई होत नाही. त्यामुळे आयुक्त सुरज मांढरे यांनी एसीबीला पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे. ज्या शिक्षकांवर छापे पडले त्यांच्यावर खुली चौकशी करण्याची मागणी एसीबीला लिहिलेल्या पत्रात सूरज मांढरे यांनी मागणी केली आहे. काही अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे.