‘पुष्पा 2 – द रुल’ याचे ऑडिओ राईट्स विक्रमी किंमतीत विकले गेले आहेत.

Pushpa 2 ALL TIME RECORD: अल्लू अर्जुन ‘पुष्पा 2 – द रुल’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून सध्या या बिगबजेट चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू झाली. अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. हा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर अल्लू अर्जुनच्या लूकची बरीच चर्चा झाली होती. पुष्पा द राइजला मिळालेल्या भरघोस यशानंतर प्रेक्षकांनी सिक्वेलबद्दल खूपच मोठ्या अपेक्षा ठेवल्या आहेत. अद्यापपर्यंत प्रदर्शनाची तारीख जाहीर नसतानाही हा चित्रपट सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय.

मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे ऑडिओ राईट्स विक्रमी किंमतीत विकले गेले आहेत. T-Series ने पुष्पा 2 – द रुल’चे सर्व भाषेतील ऑडिओ राईट्स 65 कोटी रुपयांच्या विक्रमी किंमतीत विकत घेतले आहेत.

निर्मात्यांनी जर खरच इतकी किंमत देत, चित्रपटाच्या ऑडियो राईट्ससाठी पैसे मोजले असतील तर, हा विक्रमी चित्रपट ठरेल. त्याने आधीचा विक्रम दुप्पट फरकाने मोडीत काढला असून सर्वात आधी एसएस राजामौलीच्या RRR चित्रपटाचे म्युझिक राईट्स 26 कोटी रूपयांना दिले होते. (Tollywood)

सुकुमार दिग्दर्शित, ‘पुष्पा 2 – द रुल’ मध्ये मुख्य भूमिकेत पहिल्या भागातीलच कलाकार दिसणार आहेत. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना, फहद फासिल, जगपती बाबू आणि सुनील हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. मैथ्री मुव्ही मेकर्स आणि सुकुमार राईटिंग्स निर्मित, हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. परंतु निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख उघड केलेली नाही.(Entertainment News)

By Shiv

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *