kanguva Release Date : साऊथ सुपरस्टार सूर्याचा बहुप्रतिक्षित ‘कंगुवा’ चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. या चित्रपटात बॉबी देओल खलनायकाच्या रुपात दिसणार आहे.

मुंबई : साऊथ सुपरस्टार सूर्याचा (Actor Suriya) बहुप्रतिक्षित ‘कंगुवा’ चित्रपट (Kanguva Movie) गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. या चित्रपटात बॉबी देओल (Bobby Deol) खलनायकाच्या भूमिकेत (Villian) दिसणार आहे. आश्रम वेब सीरिजमुळे बॉबी देओलच्या चाहत्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाची प्रतीक्षा लागून आहे. आता कंगुवा चित्रपटाची रिलीज डेट (Kanguva Release Movie Date) जाहीर झाली आहे. बहुप्रतिक्षित कंगुवा चित्रपट 10 ऑक्टोबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान हा चित्रपट आणखी एका चित्रपटासोबत क्लॅश होणार आहे.

सूर्या आणि बॉबी देओलच्या ‘कंगुवा’ चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा

साऊथ व्यतिरिक्त हिंदी प्रेक्षकांमध्येही सूर्याचा मोठा चाहतावर्ग आहे. कंगुवा चित्रपटात बॉबी देओलही खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात बॉबी देओलचं आक्राळ-विक्राळ दैत्याकार रूप पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे ‘लॉर्ड’ बॉबीचे चाहतेही या चित्रपटाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘कंगुवा’ बिग बजेट दक्षिणात्य चित्रपटांपैकी एक आहे. आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी कंगुवा चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख अखेर जाहीर केली आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर कंगुवा चित्रपट प्रदर्शित होणार

कंगुवा चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. अभिनेता सूर्याने त्याच्या अधिकृत सोशल मीडियावर अकाऊंटवरु एक पोस्ट शेअर करत याबाबतची अपडेट दिली आहे. या चित्रपटाचं एक पोस्टर त्याने सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये सूर्या एका हातात तलवार घेऊन उभा आहे. यावर्षी दसऱ्याच्या (Dasara) मुहूर्तावर कंगुवा चित्रपट  10 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री दिशा पटानी देखील या चित्रपटात झळकणार आहे.

By Shiv

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *