Maharashtra Din 2023 Live Updates : आज महाराष्ट्र दिन (Maharashtra Din 2023) आहे. यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
Maharashtra Din 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मागील नऊ महिन्यात राज्य सरकारनं चांगलं काम केल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांना आता विम्यासाठी पैसे भरण्याची गरज नाही. एक रुपयात विमा भरण्याचा निर्णय आपण घेतला आहे. अनेक योजनांच्या माध्यमातून शेती शाश्वत झाली पाहिजे याचा प्रयत्न करत आहोत. यातून शेतकऱ्यांचा फायदा होईल याचा प्रयत्न करत आहोत. इतिहासील सर्वात मोठी मदत महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना केली आहे. अनेक आन्हान आहेत. अवेळी पाऊस पडत आहे. खरीपात पाऊस पडला नाहीतर नियोजन करावं लागले. जलसंधारणाची काम करावी लागलीत, केंद्र सरकारनं जलसंधारणाच्या बाबतीत राज्याचा पहिला क्रमांक आला, महाराष्ट्र एकमेव राज्य असे आहे की भूजलसंवर्धानाची पातळी वाढली आहे.
येणाऱ्या काळात शेतीचे नुकसान होणार नाही यासाटी सरकार प्रयत्न करत आहे. विविध योजनांचा शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे फडणवीस म्हणाले.
नागपूरच्या कस्तुरचंद पार्क येथे महाराष्ट्र दिनाचा सोहळा, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण
Maharashtra Din : आज नागपूरच्या कस्तुरचंद पार्क येथे महाराष्ट्र दिन सोहळा साजरा होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
दुपारी 12 वाजेपर्यंत शिवाजी पार्क परिसराकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवली
1 मे 2023 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे परेड संचलन कार्यक्रम आयोजित केलं आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सकाळी सहा ते दुपारी 12 या वेळेत शिवाजी पार्क परिसराकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवण्यात आली आहे.