Navnath Waghmare : ओबीसींच्या हक्काचं आरक्षण त्यांना मराठ्यांना द्यायचं आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा करायच्या असा सवाल नवनाथ वाघमारे यांनी केला.
बुलढाणा: शिवसेना फुटीनंतर लागलेला गद्दार हा शिक्का पुसण्यासाठीच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना उभं केल्याचा गंभीर आरोप नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांनी केलं. ओबीसींच्या हक्काचं आरक्षण त्यांना मराठ्यांना द्यायचं आहे असा आरोपही वाघमारे यांनी केला. सिंदखेडराजा या ठिकाणी बोलताना त्यांनी हा आरोप केला.
ओबीसी आरक्षण बचाव उपोषण करणारे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे आज आपल्या उपोषणानंतर पहिल्यांदाच सिंदखेडराजा येथे आले. त्यांनी राजमाता जिजाऊंचा दर्शन घेऊन एका छोटेखानी सभेलाही संबोधित केलं. त्यावेळी नवनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्यावर गद्दार हा शिक्का लागलेला आहे आणि तो कुठेतरी पुसला जावा म्हणून त्यांनी मनोज जरागेंना उभं केलेलं आहे. आमच्या हक्काचं आरक्षण त्यांना मराठ्यांना द्यायचा आहे, त्यामुळे या मुख्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा करायच्या असेही नवनाथ वाघमारे म्हटले.