Pandharpur VIP Darshan : व्हीआयपी दर्शन बंद केल्याने तब्बल 8 लाख भाविकांना मिळाला वेळेत दर्शनाचा लाभ मिळाला आहे.
सोलापूर : पंढरपुरात (Pandharpur) आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) काळात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते… यावेळी सर्वसामान्य तासनतास उभे असताना व्हीआयपीच्या नावाखाली झटपट दर्शनासाठी मंदिर आणि दर्शन रांगेत घुसखोरी करीत असतात .एबीपी माझानं या संदर्भात बातमी दाखवली होती. यानंतर आता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हे व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद केले आहे . तसचं विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनरांगेत घुसखोरी करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात करण्यात आलीय.
आषाढी यात्रा काळात मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनरांगेत असताना काही मंडळी व्हीआयपीच्या नावाखाली झटपट दर्शनासाठी मंदिर आणि दर्शन रांगेत घुसखोरी करीत असतात. एबीपीने आवाज उठवल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हे व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद केले आहे. आता याचे पुढचे पाऊल टाकत प्रशासनाने अशी घुसखोरी रोखण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी पंढरपूर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 दोन अन्वये प्रतिबंधात्मक आदेश दिनांक 11 जुलै रोजी पारित केला आहे.
व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
12 जुलै रोजी रात्री 7 वाजता रमेश उत्तमराव वाघिरे राहणार नांदेड तालुका गंगापूर, औरंगाबाद व महेश वासुदेव घायतिडक राहणार उमरी पारगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड या व्यक्तींनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मुखदर्शन रांगेतून पदस्पर्शदर्शन रांगेत घुसखोरी केल्याचे सीसीटीव्ही चित्रणाद्वारे व सुरक्षारक्षकाने निदर्शनास आणून दिले होते .
दर्शनरांगेत घुसखोरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
तसेच श्रीच्या मुखदर्शन रांगेत सायंकाळी 6 वाजता व त्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने घुसखोरी केली होती. या तिन्ही व्यक्तींनी घुसखोरी करून उपविभागीय दंडाधिकारी पंढरपूर यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले असल्याने संबंधित व्यक्तीवर पंढरपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाघिरे आणि घायतीडक या दोन्ही व्यक्तीस मंदिर प्रशासनाने पोलीस विभागाच्या ताब्यात दिले आहे .
व्हीआयपी दर्शन बंद केल्याने तब्बल 8 लाख भाविकांना दर्शनाचा लाभ
व्हीआयपी दर्शन बंद केल्याने तब्बल 8 लाख भाविकांना मिळाला वेळेत दर्शनाचा लाभ मिळाला आहे. भाविकांशी गैरवर्तन करणाऱ्या सुरक्षा रक्षकावर कारवाई करण्यात आली आहे, या संदर्भात ठेकेदाराला नोटीस दिली. तसेच कर्मचाऱ्यांना भाविकांशी सौजन्याने वागण्याचे आदेश दिले आहेत.