Beed News : अक्षय आप्पासाहेब पवार (वय 24), असं मृत तरुणाचं नाव आहे.

Beed News : सरकारी अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून मेहनत करणाऱ्या तरूणाने पेपर कठीण गेला म्हणून जीनवच संपवलं. बीडमधील या घटनेने अनेकांना धक्का बसला आहे.

एमपीएससीचा पेपर अवघड गेल्याने एका 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. बीड शहरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अक्षय आप्पासाहेब पवार (वय 24), असं मृत तरुणाचं नाव आहे. अक्षय माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथे राहत होता.  

अक्षय हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्यासाठी तो बीड शहरातील नगर रोडवरील गणेशनगर भागात भाड्याने खोली घेऊन राहत होता. रविवारी त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा दिली होती. परंतु अभ्यास करूनही पेपर अवघड गेल्याने तो चिंतीत होता.

पेपर अवघड गेल्याच्या टेन्शनमध्ये त्याने हे पाऊल उचलले असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान याप्रकरणी बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

By Shiv

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *