*रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करा – गणेश गंगणे *
अंबाजोगाई (प्रतिनिधी) राडी – मुडेगाव या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. सदरील नादुरूस्त रत्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तरी इ.जी.मा.93 राडी – मुडेगाव या रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी. अशी मागणी अखिल भारतीय किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश बिभिषण गंगणे यांनी सोमवार, दि. 26 जून रोजी उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंबाजोगाई यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, इ.जि.मा.93 राडी – मुडेगाव या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. सदरील रस्त्यावर पडलेल्या खड्डयामुंळे येणार्या – जाणार्या प्रवाशांचे हाल होत आहेत. राडी-मुडेगाव गावातील आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, वयोवृद्ध प्रवासी यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. खराब रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सदरील रस्त्यावर शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर ये – जा असल्याने त्यांची ही गैरसोय होत आहे. तरी हा रस्ता तात्काळ दुरूस्त करावा असे निवेदनात म्हटले आहे. या बाबत बोलताना अखिल भारतीय किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश बिभिषण गंगणे यांनी सांगितले की, इ.जि.मा.93 राडी – मुडेगाव रस्त्याची दुरूस्ती करणे आवश्यक असून हा रस्ता लवकरात लवकर दुरूस्त केला नाही. तर राडी – मुडेगाव येथील नागरिकांसह आम्ही उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंबाजोगाई यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहोत याची नोंद घ्यावी. या आंदोलनादरम्यान होणार्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी सदरील कार्यालयाची राहिल असे तालुकाध्यक्ष गंगणे यांनी सांगितले आहे. सदरील मागणी गणेश गंगणे, धनराज कोळगीरे, शिवाजी गंगणे, सत्तार शेख फरीद शेख, इम्रान सय्यद, युसुफ शेख, नयुम शेख, सुरज वाघमारे, आश्रुबा कसपटे, मधुकर गंगणे, सादेक पठाण, शेख नुर, समीर शेख, नितीन वाघमारे, बळीराम वाघमारे, दस्तगीर बागवान, फारूख बागवान आदींसह नागरिकांनी केली आहे.