अंबाजोगाई / प्रतिनिधी
वाचाळवीर मनोहर भिडे याचे मानसिक संतुलन बिघडल्याप्रमाणे वागत असून महापुरुषांबाबत अपमान कारक वक्तव्य करीत आहे. मनोहर भिडे याच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा येरवडा येथील मनोरुग्णांच्या तुरुंगात त्यास डांबून टाकावे अशी मागणी अखिल भारतीय किसाण काँग्रेसचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष गणेश गंगणे यांनी केली असून यासंदर्भात उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना किसाण काँग्रेस च्या वतीने निवेदन सादर केले आहे. मनोहर भिडे याच्यावर लवकरात लवकर कारवाई केली नाही तर अंबाजोगाई तालुक्यात बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेसाहेब भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील यावेळी गणेश गंगणे यांनी दिला आहे.

मनोहर भिडे याने मागील काही दिवसापूर्वी थोर विचारवंत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बाबत अवामानकारक वक्तव्य केले होते. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बद्दल देखील अपमान कारक वक्तव्य केले आहे. मनोहर भिडे याच्याकडून नेहमीच महापुरुषांबाबत अपमान कारक वक्तव्य करण्यात येऊन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे समाजात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. मनोहर भिडे याच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अन्यथा त्याला येरवडा येथील मनोरुग्णांच्या तुरुंगात डांबून टाकावे अशी मागणी अखिल भारतीय किसाण काँग्रेस अंबाजोगाई तालुकाध्यक्ष गणेश गंगणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, यांना उपजिल्हाअधीकारी यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केली आहे. सदरील निवेदन देताना OBC काँग्रेसचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष धनराज कोळगीरे.शिवाजी गंगणे.सत्तार शेख. अश्रुबा कस्पटे.सुरज वाघमारे.आदींची उपस्थिती होती.

By Shiv

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *