Indian Cricket Team Live Update: टी-20 विश्वचषक 2024 ची स्पर्धा जिंकून भारतीय क्रिकेट संघ आज मायदेशी परतला.
विश्वविजेत्यासाठी मुंबई थांबली, रस्त्यावर गर्दी
वानखेडे स्टेडियमवर चॅम्पियन टीम इंडियाने चाहत्यांचे आभार व्यक्त केले. संपूर्ण स्टेडियमला फेरी मारत सर्व चाहत्यांचे आभार व्यक्त केले.
Indian Cricket Team Live Update: टी20 विश्वचषक विजेत्या टीम इंडियाची मुंबईमध्ये विजयी मिरवणूक निघणार आहे. सकाळी दिल्लीमध्ये टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर सायंकाळी मुंबईत ओपन बसमधून विजयी मिरवणूक निघेल. त्यासाठी दुपारपासूनच चाहत्यांनी नरीम पॉईंटवर गर्दी केली. वानखेडे स्टेडियमही फूल्ल झालेय. चाहत्यांची गर्दी वाढत असतानाच मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावली. धो धो पावसातही चाहत्यांचा उत्साह कायम होता. रस्त्यावर चाहते दुतर्फा थांबले होते. वानखेडेमध्ये छत्र्या उघडून चाहते बसले होते. जोरदार वाऱ्यासह जसा पाऊसही टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत सहभागी झाला होता. चाहत्यांनीही या पावसात टीम इंडियाला उत्साहात सपोर्ट कऱण्यासाठी उभे राहिले होते. मरीन ड्राईव्ह चाहत्यांच्या रंगात नाहून निघाले होते. मुंबईकरांच्या स्पिरिटचे सोशल मीडियावर कौतुक होतेय. सोशल मीडियावर टीम इंडियाच्या स्वागातासाठी उभे असणाऱ्या चाहत्यांचा उत्साह दिसून येतोय.